रेल्वेच्या धडकेत दोन गवे ठार…

2

मडुरा येथील घटना; वन व रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल…

बांदा,ता.१८: मडुरा उपराळ येथे मुंबईहून गोव्याकडे जाणार्‍या मंगळूरु एक्सप्रेसच्या धडकेत दोन गवे जागीच ठार झाले. मडूरा रेल्वे स्टेशन पासून २ किमी अंतरावर आज सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे चालकाने अपघाताची माहिती मडूरे रेल्वे स्टेशन मास्तरांना दिली. मडूरा पशुवैद्यकीय अधिकारी ए. आर. साळगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. दोन्ही गवे मादी जातीचे असून पैकी एक गाभण असल्याचे सांगितले. वनरक्षक आप्पासो राठोड वन कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

2

4