तो मृतदेह परप्रांतियाचा असण्याची शक्यता…

2

कणकवली, ता.१८:  शहरातील वरचीवाडी-साईनगर भागात आढळलेला मृतदेह परप्रांतियाचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चार दिवसापूर्वी आसाम येथील एक तरुण बेपत्ता झाल्याची फिर्याद कणकवली पोलिस ठाण्यात नोंद झाली होती. त्या अनुषंगाने त्या बेपत्ता तरुणाच्या नातेवाइकांना कणकवलीत बोलाविण्यात आले आहे.
शहरातील वरचीवाडी-साईनगर भागातील एका झाडावर गळफास लावलेल्या स्थितीत एक मृतदेह आज सकाळी आढळून आला होता. या मृतदेहापासून काही अंतरावर एक मोबाईल फोडलेल्या स्थितीत होता. त्यामुळे आत्महत्या की घातपात याबाबतची चर्चा सुरू होती. गळफास लावलेला मृतदेह ज्या भागात आढळला तो भाग दुर्गम आणि जंगलमय आहे. आज दुपारी पोलिसांनी येथील मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. मृतदेह सडल्याने चार ते पाच दिवसापूर्वी त्या तरूणाने गळफास लावून घेतल्याचा अंदाज आहे.

1

4