बांदा-आंबिये मठात सोहिरोबानाथ जयंती उत्सव उत्साहात…

2

बांदा.ता,१८: 
येथिल संत सोहिरोबानाथ आंबिये मठामध्ये गुरुप्रतिपदेला संत सोहिरोबानाथ जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला.या सोहळ्यानिमित्त मठात सकाळपासुन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या जयंतीसोहळ्या पासुन श्रीरामनवमीपर्यंत बांदा सोहिरा मठामध्ये ‘नाथ सेवा उत्सव’ चालणार आहे.
गुरुप्रतिपदेला  सकाळी पुरोहित दिपक पेंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली नाथवंशज प्रसाद आंबिये यांनी संत सोहिरोबानाथांच्या मुळ पादुकांची पुजा अर्चा तसेच एकादशणी, अभिषेक पुजा केली. त्यानंतर आरती होऊन तीर्थप्रसादास प्रारंभ झाला. यानंतर संत सोहिरोबानाथ चरित्रामृताचे वाचन करण्यात आले. सायंकाळी महिला भजनकर्मींची भजनसेवा झाली. त्यानंतर नित्य सायंआरती झाली. रात्रो स्थानिक नित्य भजनकर्मींची भजनसेवा झाली. तसेच आरती करण्यात आली. भाविकांनी मोठ्या संख्येने संत सोहिरोबानाथ पादुका दर्शन तसेच तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
नाथांच्या जयंतीपासून मठात नाथ सेवा उत्सव आरंभ झाला आहे. यासाठी नाथ सेवा मंडप उभारण्यात आला आहे. नित्य मंगळवारची भजन सेवा व गुरुवारची माध्यान्ह आरती यांच्यासह उत्सवकाळात दर मंगळवारी सायं ५ ते ६ या वेळेत श्रीराम नामाचा जप होणार आहे. तसेच दर गुरुवारी सायंकाळी ५ ते ६ महिला भजनकर्मींची भजनसेवा होणार आहे. हा नाथ सेवा उत्सव नाथांचा निर्वाणदिन असलेल्या रामनवमी पर्यंत चालणार आहे. या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संत सोहिरोबानाथ भक्त परिवारातर्फे  करण्यात आले आहे.

2

4