कोलगाव उपसरपंचपदी बंड्या घोगळे यांची बिनविरोध निवड…

2

शिवसेनेकडून सत्कार;जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार व्यक्त केला विश्वास

सावंतवाडी.ता,१८: कोलगांव उपसरपंचपदी शिवसेनेच्या शिवदत्त उर्फ बंड्या घोगळे यांची बिनविरोध निवड आज करण्यात आली.विद्यमान उपसरपंच संदीप गवस यांचा कार्यकाल संपल्याने घोगळे यांना त्या ठीकाणी संधी देण्यात आली. आपल्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन. जनतेसाठी काम करेन असा विश्वास घोगळे यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते शिवदत्त घोगळे यांना पुष्पगुच्छ देऊन तसेच हार घालून अभिनंदन करण्यात आले.याचसोबत शिवदत्त घोगळे यांची जिल्हा नियोजन सयांत्रिकीकरण मध्ये सावंतवाडी तालुक्यातून ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांच्या आईच्या हस्ते शाल,श्नीफळ,नारळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प.सदस्य मायकल डिसोजा, पं.स.सदस्य मेघश्याम काजरेकर,सरपंच मारिया डिमेलो,माजी सरपंच फ्रान्सिस डिसोजा,आंबेगाव सरपंच वर्षा वरक,आप्पा सावंत,नामदेव नाईक,माजी उपसभापती चंद्रकांत कासार,योगेश नाईक,संदीप माळकर,माजी उपसरपंच पप्पू ठिकार,संदीप गवस,ग्रा.प.सदस्य तुकाराम कासार,संदेशा वेंगुर्लेकर,मधूरा नाईक,सुधा ठाकर,भरत सावंत,लाडू जाधव,शाखाप्रमुख सुदू परब,निशिकांत पडते,कुलदीप राऊळ आदी उपस्थित होते.

7

4