कणकवलीत मराठा समाजाच्यावतीने शिवजयंती….

2

कणकवली, ता.१८ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनानिमित्त कणकवली मराठा समाजाच्यावतीने १९ फेब्रुवारी २०२० रोजी ‘शिवजयंती सोहळा २०२०’ चे आयोजन करण्यात आले आहे़. या शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला शिवप्रतिमेची स्थापना, तर रात्रौ ९ वा़ देवाक काळजी हे नाटक आयोजित करण्यात आले आहे़.

शिवजयंती निमित्त १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १० वा़ शिवप्रतिमेची स्थापना, वक्तृत्व स्पर्धा (इयत्ता तिसरी ते सातवी) – विषय : शिवरायांच्या स्वराज्य जडणघडणीतील एक प्रसंग, दुसरा गट (इयत्ता आठवी ते दहावी) – विषय : मातोश्री जीजाऊ आणि स्वराज्य, तिसरा गट (महाविद्यालयीन) – विषय : शिवशासन पध्दतीचा आजच्या काळात उपयोग ही काळाची गरज़ त्यानंतर दुपारी २ वा़ शिवचरित्रावर आधारीत लेखी प्रश्नावली स्पर्धा ५० वस्तूनिष्ठ प्रश्न (उत्तर एका शब्दात) इयत्ता ४ ते ७ वी मुलांसाठी घेण्यात येणार आहे़ अधिक माहितीसाठी प्रशांत दळवी, दत्तात्रय सावंत यांच्याशी संपर्क साधावा़ तरी या शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे़

7

4