भुईबावडा येथे महाशिवरात्रीनिमित्त २० पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन…

2

वैभववाडी.ता,१८:  भुईबावडा येथे महाशिवरात्रीनिमित्त गुरूवार दि. २० ते २२ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणेः- गुरुवार दि. २० रोजी पहाटे ५ ते ६ वा. काकड आरती, सकाळी ९ ते ११ वा. प्रतिमा पूजन, सायंकाळी ५ ते ६ वा. प्रवचन ह.भ. प. श्री तुकाराम महाराज पावले भुईबावडा, सायंकाळी ७ ते ८ वा. हरिपाठ, रात्रौ ९ ते ११ वा. हरिकिर्तन ह, भ. प. श्री मारुती महाराज भालेकर व नंतर हरिजागर.
शुक्रवार दि. २१ रोजी सकाळी ९ ते ११ वा. अभिषेक, सकाळी ११ ते १ वा. शिवलीलामृत ११ वा अध्याय पारायण, दुपारी ३ वा. हळदीकूंकु, सायंकाळी ५ ते ६ वा. प्रवचन ह. भ. प. श्री अनंत महाराज मोरे(मौदे), सायंकाळी ७ ते ८ वा. हरिपाठ, रात्रौ ९ ते ११ वा. किर्तन श्री मंगेश महाराज शिंदे(आळंदी).
शनिवार दि. २२ रोजी काल्याचे किर्तन ह. भ. प. श्री अनंत महाराज मोरे आदी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

6

4