उपाध्यक्षपदी अफरोजा नावलेकर तर सचिवपदी निशा गुरव…
कणकवली, ता.१८: कणकवली तालुका सरपंच-उपसरपंच संघटनेची कार्यकारिणी आज गठित करण्यात आली. यात अध्यक्षपदी पिसेकामते सरपंच सुहास राणे, उपाध्यक्षपदी नांदगाव सरपंच अफरोजा नावलेकर तर सचिवपदी निशा गुरव आणि खजिनदारपदी चंद्रकांत परब (हरकुळ बु्रद्रुक) यांची एकमताने निवड करण्यात आली.
आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली भाजप कार्यालयात कणकवली तालुका सरपंच-उपसरपंच संघटनेची बैठक झाली. यात सर्वानुमते तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. यावेळी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच तसेच पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे, राजन चिके उपस्थित होते.