सावंतवाडीत “शिवचेतना यात्रे”ला उत्स्फूर्त प्रतिसाद…

2

स्वराज्य संघटनेचे आयोजन; हजारोच्या संख्येने शिवभक्त सहभागी…

सावंतवाडी ता.१९: “जय भवानी…. जय शिवाजी….”च्या जय घोषात आज येथील शिवभक्तांनी शहरात भव्य “शिवचेतना यात्रा” काढली.यावेळी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.येथील स्वराज्य संघटनेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या या यात्रेचा शुभारंभ संस्थानचे युवराज लखम सावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.दरम्यान राजवाडा येथून प्रारंभ झालेल्या या रॅलीत हजारोच्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले आहेत.ही रॅली संपूर्ण शहरात फिरवली जाणार आहे.
यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर नगरसेवक परिमल नाईक महेंद्र सांगेलकर आशिष सुभेदार परिणीता वर्तक साक्षी वंजारी मोहिनी मडगावकर अमित परब बाबल्या दुभाषी दिलीप भालेकर उमेश कोरगावकर अमोल साटेलकर, अजय सावंत विनायक ठाकूर बाळा कुडतरकर,अजय सावंत, श्रीपाद सावंत विलास जाधव सुनिल पेडणेकर बाबू कुडतरकर अशोक दळवी सोमेश्वर सावंत शैलेश तावडे महेश बांदेकर महेश पांचाळ सुधीर आडिवरेकर कुणाल शृंगारे बाळा कावले विकी हळदणकर, संतोष जोईल अंकित तेंडुलकर गौरेश कामत शुभम बिद्रे गुरु मठकर, सतीश बागवे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर पाटकर सिद्धेश गावडे निरज भोसले

8

4