Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याशालांतर प्रमाणपत्र परीक्षेतील क्रीडा गुणांच्या कार्यपद्धतीत सुधारणा...

शालांतर प्रमाणपत्र परीक्षेतील क्रीडा गुणांच्या कार्यपद्धतीत सुधारणा…

सिंधुदुर्गनगरी ता.१९: माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस बसणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या क्रीडा गुणांच्या सुधारित नियमावलीस मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार एकविध खेळांच्या संघटनेद्वारे आयोजित केलेल्या सांघिक, वैयक्तित खेळांच्या स्पर्धेत जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीयस्तरावर सहभागी होणाऱ्या व विशेष प्राविम्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलवतीचे क्रीडा गुणे देता येणार आहेत. याबाबत वाढीव गुणांचा लाभ जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना देण्यासाठी विविध क्रीडा प्रकारांच्या जिल्हास्तर एकविध संघटनेच्या व स्पर्धेच्या अधिकृततेबाबतची कागदपत्रे संबंधित संघटनांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्हास्तर एकविध संघटनांनी आपला अहवाल दिनांक 15 मार्च 2020 पूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर हे कळवितात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments