आम्ही भारतीय नागरिक मंचाच्यावतीने सावंतवाडीत शिवजयंती साजरी…

2

सावंतवाडी. ता,१९: येथील आम्ही भारतीय नागरीक सजक मंचाच्या माध्यमातून आज छ्त्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील बाहेरचावाडा सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे ही जयंती साजरी करण्यात आली आहे.यावेळी सर्व धर्मीय,सर्व पक्षीय आणि सर्व सामाजिक,धार्मिक संघटना सर्व परिवर्तन वादी संघटना यांनी आपापल्या पदाधिकारी,कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्या सह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शफीक खान,चॉद मैनुद्दिन करोल,लियाकत पडवेकर, रफिक मेमन, महंम्मद समेजा,मेहबूब हुसेन शेख,महंम्मद इमान शेख,समीर बेग,सेंट्रल इंग्लिश स्कूल अध्यक्ष इम्तियाज खानापुरी प्रभारी मुख्याध्यापिका निर्मला हेषगोळ,हिदातुल्ला खान, रिजवान पटेल तौकिर शेख,जिगर मेमन व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी यांची उपस्थिती होते

शिवजयंतीच्या निमित्ताने रफीफ मेमन यांनी सेंट्रल इंग्लिश स्कूल साठी २५ खुर्च्या भेट दिल्या सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेंट्रल इंग्लिश स्कूलचे पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले

2

4