Sunday, December 14, 2025
Google search engine
HomeUncategorizedरेल्वेच्या तिकिटाचा काळाबाजार केल्याप्रकरणी दोघांना जामीन

रेल्वेच्या तिकिटाचा काळाबाजार केल्याप्रकरणी दोघांना जामीन

सावंतवाडी ता.१९: रेल्वेच्या तिकिटाचा काळाबाजार केल्याप्रकरणी कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील पथकाने आज एकाला ताब्यात घेतले.तर काल सायंकाळी उशिरा सावंतवाडी शहरात अन्य एकाला ताब्यात घेतले होते.दरम्यान आज त्या दोघांना येथील न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी पंधरा हजार रुपये जामिनावर मुक्तता करण्यात आली.मनोहर शरद पारकर (३०) रा.निरवडे व अजय नारायण कोळंबेकर (रा.भटवाडी),अशी त्यांची नावे आहेत.याकामी अँड.सुहेब डींगणकर व राहुल पै यांनी काम पाहिले.
याबाबत अधिक माहिती अशी की,संशयित पारकर
हा सावंतवाडी रेल्वे स्टेशन यात्री आरक्षण केंद्रावर तिकिटे विकत होता.त्याच्याकडून तीन तिकीटे,एक मोबाईल,१३० रुपये रोख,असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई रेल्वे पोलीस उपनिरीक्षक अरुण लोट यांनी केली.तर दुसरी कारवाई येथील पोस्ट ऑफिस कार्यालयात करण्यात आली.यात अजय कोळंबेकर याच्या कडून रेल्वेचे तिकीट,एक मोबाईल आणि अडीच हजार रुपये रोख,असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments