Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामडुरे-मोरकेवाडी नदीपात्रात मृतावस्थेत आढळली महाकाय मगर...

मडुरे-मोरकेवाडी नदीपात्रात मृतावस्थेत आढळली महाकाय मगर…

बांदा ता.१९:  मडुरा-मोरकेवाडी येथील नदीपात्रात आज सुमारे ६ फूट लांबीची मगर मृतावस्थेत आढळून आली.नदी परिसरात दुर्गंधी येत असल्याने पाहण्यास गेलेल्या शेतकरी मधुसुदन परब यांना ही मगर पाण्यात तरंगताना निदर्शनास आली दरम्यान दोन ते तीन दिवसांपूर्वी ही मगर मृत झाल्याचा अंदाज वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी व्यक्त केला.यावेळी मडुरा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल साळगावकर यांनी शवविच्छेदन मारून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मगरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मडुरा परिसरात मगरींची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांचा उपद्रवही खूप वाढता आहे. बुधवारी सकाळी शेतकरी मधुसुदन परब हे आपल्या शेतात फेरफटका मारताना नदीत दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. शोध घेतल्यानंतर नदीत महाकाय मगर मृतावस्थेत त्यांना तरंगताना दिसली. याची खबर त्यांनी स्थानिक व वनविभागाला दिली.
मृतावस्थेत मगर असल्याची खबर मिळताच सावंतवाडी वनपाल गजानन पाणपट्टे, आजगाव वनपाल सी.व्ही.धुरी, वनरक्षक आप्पासो राठोड, श्री.पडते यांनी घटनास्थळी धाव घेत मगरीला दहन केले.
क्रोकोडाईल पार्क कधी ?
इन्सुलीत तेरेखोल नदीपात्रात मगरींची संख्या मोठी असल्याने त्याठिकाणी मगरपार्क उभारण्याचे तत्कालिन पालकमंत्री आ. दीपक केसरकर यांनी आश्वासन दिले होते. सावंतवाडी उपवनसंरक्षक कार्यालयातील बैठकीत तसे जाहीर केले होते. या पार्कमध्ये मडूरे नदीतील मगरी पकडून नेण्याचे मान्य केले होते. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही शून्य. मगरींच्या उपद्रवाला त्रासलेले शेतकरी क्रोकोडाईल पार्क कधी उभारणार असा सवाल प्रशासनाला करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments