वैभववाडी तालुक्यात शिवजयंती उत्सवात साजरी…

2

वैभववाडी/पंकज मोरे.ता,१९: वैभववाडी तालुक्यात पारंपारिक पध्दतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भगवे फेटे, भगवे ध्वज घेत बैलगाडीतून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक पध्दतीने काढण्यात आलेली ही मिरवणूक नागरिकांचे आकर्षण ठरली.
पारंपारिक वेशात सहभागी झालेले युवक व नऊवारी साड्या परिधान करून भाग घेतलेल्या युवती नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. ढोल, ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. घोडेस्वार हे लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. तळपत्या उन्हात तरुणाईचा उत्साह दिसून येत होता. तसेच भुईबावडा, अरुळे, कुर्ली, नाधवडे, खांबाळे, आचिर्णे, सडुरे, लोरे, सांगुळवाडी, नावळे, कोकिसरे यांसह अन्य गावात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी पं. स. सदस्य अरविंद रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, भालचंद्र साठे, माजी नगरसेवक संताजी रावराणे, भाजपा महिला तालुकाध्यक्षा भारती रावराणे, प्राची तावडे, किशोर दळवी यांच्यासह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0

4