बांदा.ता,१९: ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या जय घोषात, महिलांनी सादर केलेले ढोल-ताशे व लेझीम पथकाच्या जल्लोषात आज बांदा दशक्रोशीतील शिवभक्तांनी शहरात भव्य ‘शिवचेतना यात्रा’ काढली. यावेळी संपूर्ण शहर भगवामय झाले होते. बांदा दशक्रोशी शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झालेत. या रॅलीत हजारोच्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले आहेत. यामध्ये महिला व लहान मुलांनी शिवाजी महाराज, जिजाबाईच्या वेशभूषा सादर करून यात्रेत सहभाग घेतला.
कट्टा कॉर्नर येथे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. येथील चौकाला माजी सरपंच अशोक सावंत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले. बाल शिवाजी नैतिक निलेश मोरजकर याच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवचेतना यात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारित देखावा उभारण्यात आला होता. ठिकठिकाणी चौकात शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित पथनाट्ये सादर करण्यात आली.
शहरात चौकाचौकात यात्रेचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. सुरुवातीला समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. गांधीचौक, उभाबाजार, तेलीतिठा, संभाजी चौक, श्री बांदेश्वर मंदिर पर्यंत यात्रा काढण्यात आली. पिंपळेश्वर मंदिर चौक येथे अफझलखान वध नाटिका सादर करण्यात आली. श्री बांदेश्वर मंदिर येथे शिवराज्याभिषेक सोहळा सादर करून यात्रेची सांगता करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ, जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, सरपंच अक्रम खान, तांबोळी सरपंच अभिलाष देसाई, शेर्ले सरपंच उदय धुरी, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, माजी उपसभापती निकिता सावंत, प्रसाद पावसकर, बाळू सावंत, सचिन नाटेकर, उपसरपंच हर्षद कामत, विकी केरकर, बाळा आकेरकर, अवंती पंडित, मकरंद तोरस्कर यांच्यासह हजारो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
बांद्यात “शिवचेतना यात्रेला” उत्स्फूर्त प्रतिसाद…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES