Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडीत लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा...

सावंतवाडीत लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा…

सावंतवाडी,ता.१९ : क्रीडा तपस्वी कै.शिवाजीराव भिसे (सर) यांच्या स्मृतिदिनानिमित्त पहिली व दुसरीतील मुलांच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन दि.२२ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे ठिकाण जगन्नाथ राव भोसले शिव उद्यान २२ फेब्रुवारी सायंकाळी ४ वा ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत प्राणी चित्रे काढायची आहेत.
स्पर्धकांनी चित्रकलेसाठी लागणारे साहित्य स्वत: घेऊन येणे.आयोजकांकडून चित्रकला पेपर पुरवले जातील.स्पर्धेतील सहभागी विद्यार्यांना सहभाग प्रमाणपत्र व विजेत्यांना रोख रक्कम बक्षीस दिले जाईल, असे आयोजक अनिल भिसे यांनी सांगितले
या स्पर्धेसाठी नावनोंदणी शनिवार दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करावी त्यासाठी संपर्क – रत्नाकर माळी – ९४२०७३९१७३ यांच्याशी साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे आयोजन अनिल भिसे मित्र मंडळ, सावंतवाडी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments