ओरोस ता.२०:सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या जिल्हाध्यक्ष पदी सुजित प्रकाश जाधव यांची बहुमताने निवड झाली असून जिल्हा सरचिटणीस पदी चंद्रसेन कृष्णा पाताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
२०२० ते २०२३ या त्रैवार्षिक कालावधीसाठी जिल्हा कार्यकारिणीची निवड नुकत्याच कुडाळ येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. चर्मकार समाजाच्या शेकडो सभासदांनी सभेस उपस्थित राहून खालील प्रमाणे जिल्हा कार्यकारिणी निवड केली.
जिल्हाध्यक्ष सुजित जाधव (कणकवली), जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे (मालवण), उपाध्यक्ष सुरेश पवार(कुडाळ), सुधाकर माणगावकर (मालवण), लवू चव्हाण (सावंतवाड़ी), प्रकाश नारकर (वैभववाड़ी), कोषाध्यक्ष नामदेव जाधव (कणकवली), सहसचिव अनिल भि.चव्हाण (कणकवली), प्रशांत मिठबावकर (देवगड़), गुरुप्रसाद चव्हाण (वेंगुर्ले), सुरेश बांदेकर (दोडामार्ग), सदस्य म्हणून प्रभाकर चव्हाण (कणकवली), वसंत चव्हाण (मालवण), विश्वनाथ शिरकर (देवगड़), कल्याण कदम (सावंतवाडी), विजय केळकर (वैभववाडी), ज्ञानेश्वर तळकटकर (दोडामार्ग), वासुदेव कसालकर (कुडाळ), सुहास मोचेमाडकर (वेंगुर्ले), महिला सदस्य म्हणून सौ.प्रमिला चव्हाण(कणकवली), वैशाली पाताडे (मालवण), सुप्रिया चव्हाण (कुडाळ), रेश्मा चव्हाण (देवगड़), सुषमा चव्हाण (सावंतवाडी), साक्षी नेवरेकर (वैभववाड़ी), सपना जांभोटकर (दोडामार्ग), ऊर्मिला चव्हाण (वेंगुर्ले) यांची निवड करण्यात आली.
संघटनेच्या कार्यकारिणीचा आणखी विस्तार मार्गदर्शक, सल्लागार तसेच विविध समित्या नेमून लवकरच करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी सांगितले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहून सर्व समाजबांधवाना सोबत घेऊन काम करणार असल्याचेही नूतन जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी सांगितले.