स्वतः अत्यवस्थ असतानासुद्धा “तो” दुस-याच्या मदतीसाठी धावला…

2

सावंतवाडीतील घटना; पाणी समजून पेट्रोल पिल्याने रुग्णवाहिका चालक अत्यवस्थ…

सावंतवाडी/शुभम धुरी ता.२०: रुग्णाचे प्राण वाचवणे हे आद्य कर्तव्य मानणाऱ्या खाजगी रुग्णवाहिका चालकाने आज समाजाला एक वेगळा पायंडा दाखवून दिला.अत्यवस्थ रुग्णाला घाईगडबडीत हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्याच्या नादात पाणी म्हणून त्याने चुकून पेट्रोल प्राशन केले.यात तो अत्यवस्थ झाला.मात्र त्याच अवस्थेत त्याने प्रथम रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेले व त्यानंतर आपण येऊन येथील कुटीर रुग्णालयात दाखल झाला.ही घटना आज पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.हेमंत वागळे( २५) रा. इन्सुली,असे त्याचे नाव आहे.त्याच्यावर येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान त्याच्या या अनोख्या धाडसाचे सगळीकडून कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,हेमंत हा युवक येथील एका खाजगी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कामाला आहे.मात्र रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सहकार्य करणे हे तो आपले आद्य कर्तव्य समजतो.येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना नेहमीच त्याचे सहकार्य लागते.तेच कर्तव्य पार पाडत असताना आज त्याला स्वतःच्या जीवाशी खेळावे लागले.रुग्णाला आपल्या रुग्णवाहिकेतून तात्काळ बांबुळी रुग्णालयात पोचवीत असताना घाईगडबडीत बाजूला असलेले पेट्रोल त्याने पाणी समजून प्राशन केले.मात्र तशाच परिस्थितीत त्याने रुग्णाला रुग्णालयात पोचविले व नंतर येथील उपजिल्हा रुग्णालयात येत स्वतःवर उपचार करून घेतले.दरम्यान या घटनेनंतर उपचार घ्यायला चार तास उलटल्याने त्याच्या घशाला गंभीर दुखापत झाली आहे.दरम्यान त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

0

4