Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedवेंगुर्लेत शिवजयंती निमित्त शिवप्रेमी मित्रमंडळाचा अनोखा उपक्रम...

वेंगुर्लेत शिवजयंती निमित्त शिवप्रेमी मित्रमंडळाचा अनोखा उपक्रम…

नगरपालिका स्वच्छता कर्मचारी व आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचा केला सत्कार…

वेंगुर्ले : ता.२० शिवप्रेमी मित्रमंडळ माणिकचौक वेंगुर्ला यांच्यातर्फे माणिकचौक येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने सायंकाळी नगरपालिका स्वच्छता कर्मचारी व आरोग्य विभाग कर्मचारी याचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
माणिकचौक येथे सकाळ पासूनच विविविध कार्यक्रमाना प्रारंभ झाला. सकाळी जोर बैठका, त्यांनतर रॅली, सायंकाळी चक्री कीर्तन कार्यक्रम झाला. दरम्यान स्वच्छता कर्मचारी हा वेंगुर्ले शहराच्या स्वछतेसाठी झटत असतात. त्यामुळे त्यांचा सत्कार या मंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष- रोहित वेंगुलेकर, विनय गोगटे, जगदीश आरोसकर, सुनिल वेंगुलेकर, अर्जुन माजरेकर, शुभ भाई, सौ,स्मिता कोयडे, शेखर काणेकर, प्रसाद बागायतकर, नितिश कुडतरकर, सुयोग चेंदवणकर, प्रसाद गुरव, सौरभ बेहरे, अभि माजरेकर, कुणाल मोर्य, शुभम हळदणकर,विवेक वेंगुलेकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments