बेकायदा वाळू वाहतूकीला बांदा पोलिसांकडुन “अभय”

2

शामसुंदर धुरींचा आरोप;गोव्यातून होणारी वाहतुक रोखण्याचा इशारा

बांदा
बांदा पोलीस तपासणी नाक्यावरील पोलीस कर्मचारी एन्ट्री फी घेऊन बिगरपरवाना रेती वाहतुकीचे डंपर खुलेआम सोडत आहेत. यामुळे रेती उत्खननाचे टेंडर घेण्यास कोणीही इच्छुक नाही आहेत. यामुळे स्थानिक डंपर चालक अडचणीत आले असून याला तात्काळ आळा न बसल्यास आम्ही आंदोलन छेडून सर्व बिगरपरवाना गाड्या बांदा येथे अडवून ठेवू असा इशारा श्री साई समर्थ डंपर व ट्रक चालक मालक संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्यामसुंदर धुरी यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांना दिले आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, सदरची वाहतूक ही रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू असते. एका रात्रीत शेकडो डंपर रेतीची वाहतूक गोव्यात करण्यात येते. तपासणी नाक्यावरील पोलीस कर्मचारी एन्ट्री फी घेऊन अशा बेकायदा रेती वाहतुकीला प्रोत्साहन देत आहेत. यामुळे आमच्या संघटनेच्या कायद्याने चालणाऱ्या गाड्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास आम्ही सर्व गाड्या रात्रीत बांदा येथे अडवून आंदोलन छेडू असा इशारा धुरी यांनी निवेदनात दिला आहे.

4

4