वेंगुर्ले “छत्रपती चषक २०२०” जय मानसीश्वर संघ मानकरी…

2

शिवप्रेमी व कबड्डी प्रेमींकडून शिवजयंतीनिमित्त आयोजन…

वेंगुर्ले,ता.२१: शिवजयंती निमित्त शिवप्रेमी व कबड्डी प्रेमी वेंगुर्ला यांनी घेतलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन च्या मान्यतेने व वेंगुर्ला तालुका कबड्डी असोसिएशन च्या सहकार्याने वेंगुर्ला कॅम्प मैदानावरील जिल्हास्तरीय पुरुष गटाच्या स्पर्धेत जय मानसीश्वर संघाने विजयी होत रोख ७०००/- विलास गावडे पुरस्कृत व छत्रपती चषकाचा मान मिळविला.
वेगुर्लेत रोमहर्षक झालेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांक संघर्ष कोचरा संघ ५०००/- परशुराम वारंग पुरस्कृत व चषक, तृतीय रेवतळे मालवण १०००/- तन्मय जोशी पुरस्कृत व चषक व यंग स्टार कणकवली १०००/- सुभाष बोवलेकर व चषक चा मानकरी ठरला. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट पकड लक्ष्मीकांत आरोलकर (जय मानसीश्वर), पाचशे व चषक उत्कृष्ट चढाई गोविंद नरे (संघर्ष कोचरा) ५०० व चषक तर अष्टपैलू खेळाडू संकेत साटेलकर (जय मानसीश्वर) ५०० व चषक यांची निवड करून गौरविण्यात आले. स्पर्धेतील चषक ओम कुबल यांनी पुरस्कृत केले होते.. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील नामवंत बारा संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून विलास गावडे, परशुराम वारंग, सुहास गवंडळकर, वीरेंद्र आडारकर, बबलू कुबल, तुषार साळगावकर, तन्मय जोशी, संधू मोघे, बाबली वायंगणकर, सुरेंद्र चव्हाण, ब्रह्मानंद तेरेखोलकर, भूषण अंगचेकर, महेंद्र मोचेमडकर, नामदेव सरमळकर, जया चुडनाईक, बबलू आडेलकर उपस्थित होते.
पंच म्हणून सिताराम रेडकर, सागर पांगुळ, हेमंत गावडे, जयेश परब, प्रथमेश नाईक, विश्राम नाईक, संदीप वेंगुर्लेकर, आप्पा मुंज, गौरेश वायंगणकर यांनी काम पाहिले.

1

4