माजी विद्यार्थ्यांकडून कळसुलकर शाळेसाठी ७५ हजाराची देणगी…

2

सावंतवाडी ता.२२: येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या इमारत निधीसाठी,शाळेच्या १९७५ च्या जुनी एस. एस. सी. (११वी) बॅचच्या विद्यार्थ्यांनी ७५ हजार रुपयांची देणगी दिली.क्रीडातपस्वी,स्वर्गीय शिवाजी भिसे सर यांच्या स्मृतिदिनी आज हा निधी या बॅचचे विद्यार्थी खुशाल सुराणा यांनी‌ धनादेशाद्वारे सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै यांच्याकडे सुपूर्त केला.
यावेळी भिसे सरांचे सुपुत्र व संस्थेचे माजी संचालक अनील भिसे, पुतणे अरुण भिसे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, उपाध्यक्ष व सोसायटीचे संचालक अरविंद शिरसाट, १९७५ च्या बॅचचे हेमंत मुंज उपस्थित होते. याच बॅचच्या अरुण सौदागर यांनी माजी विद्यार्थी संघाला दिलेली सात हजार रुपयांची देणगी यावेळी मुंज यांच्या हस्ते गोठोसकर यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपुर्त करण्यात आली. सौदागर यांनी याआधीही माजी विद्यार्थी संघ आणि शाळेला प्रत्येकी पाच हजार रुपयांची देणगी दिली आहे.

4

4