नवी मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या…?

2

तब्बल दोन महिन्यांनी प्रकार उघड;मृतदेह सडल्याने तपासात अडचणी…

मुंबई.ता,२२: नवी मुंबई येथे एका बंद फ्लॅटमध्ये चार मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.त्यात दोन मुलांसह आई-वडिलांचा समावेश आहे.
आज सकाळी हा प्रकार उघड झाला. त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.तब्बल दोन महिन्यांनी हे मृत्यूदेह मिळाल्यामुळे ते पूर्णतः सडलेल्या अवस्थेत आहेत.त्यामुळे नेमकी आत्महत्या त्यांनी का केली हे कळू शकले नाही.
हे कुटुंब बाहेर गेले असल्यामुळे बाजूला राहणाऱ्या लोकांनी प्रथम दुर्लक्ष केले.परंतु त्यांचा फोन किंवा कोणताही प्रतिसाद नसल्यामुळे त्यांना संशय आला त्यामुळे आज पोलिसांच्या मदतीने त्यांनी आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाचे घर उघडले यावेळी हा सर्व प्रकार उघड झाला. या चौघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.

4

4