मडु-यात आढळलेल्या “त्या” मगरींच्या मृत्यूची चौकशी व्हावी…

2

साईप्रसाद कल्याणकर यांची सावंतवाडी वनविभागाकडे मागणी…

बांदा ता.२२: तेरेखोल नदीत वारंवार मृतावस्थेत महाकाय मगरी आढळून येत आहेत.त्यामुळे या मगरी मरतात,की मारल्या जातात याचा शोध घेणे गरजेचे आहे,अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी मांडली.दरम्यान या मगरीच्या शवविच्छेदनाचा अहवाल लक्षात घेऊन या प्रकाराची योग्य ती सखोल चौकशी करण्यात यावी,अशी मागणी आपण वनविभागाकडे करणार आहे,असे श्री.कल्याणकर म्हणाले.
मडुरा येथे दोन मगरींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी ब्रेकिंग मालवणीला आपली प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले हा वर्ग एक मधील प्राणी आहे.त्याला कायद्याने संरक्षण आहे.असे असताना इन्सुली येथे मगर पार्क करण्यात यावा,अशी मागणी आपण यापूर्वी केली होती.परंतु त्या काळात अशा प्रकारे मगरींचा मृत्यू होणे हे निसर्गाच्या दृष्टीने घातक आहे.त्यामुळे या प्रकाराची चौकशी व्हावी,अशी मागणी आपण करणार आहे.

7

4