आडेली येथील के.के.चमणकर हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात…

2

वेंगुर्ले ता.२२: आडेली येथील के.के.चमणकर हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.जागृती वायंगणकर उपस्थित होत्या.

यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.नंतर प्रशालेतील सहा. शिक्षक संतोष पवार यांनी शिवाजी महाराजांची स्वराज्य स्थापने बद्दलची माहिती दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्जुन माळी यांनी केले.या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

2

4