कणकवलीत वारीस पठाण यांच्या पुतळ्याचे दहन…

2

वादग्रस्त वक्तव्याचा निषेध: आमदार राणेंसह भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती

कणकवली, ता.२२: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहदुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आज कणकवलीत दहन करण्यात आले. आमदार नीतेश राणे यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण 15 कोटी असून 100 कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. पठाण यांच्या या वक्तव्याचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी येथील भगवती मंगल कार्यालयासमोर आज पठान यांचा पुतळा जाळला. तत्पूर्वी पठाण यांच्या पुतळ्याला लाथा मारण्यात आल्या आणि पठाण मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे, प्रज्ञा ढवण, राजन चिके, संतोष कानडे, रवी शेट्ये, मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री यांच्यासह डॉ. हर्षद पटेल, अ‍ॅड. राहुल तांबोळकर, दादा पावसकर, योगेश ताम्हाणेकर, अखिल आजगावकर, नागेश मोगविरा, महेश लिंगुडकर, निलेश वाळके, सखाराम संकपाळ, राकेश काणेकर, विज्ञेश गोखले आदी उपस्थित होते.

3

4