पाणी समजून डिझेल प्यायल्याने दोन लहान मुले गंभीर…

2

पिंगुळी येथील घटना; अत्यवस्थ मुले रस्ता कामगारांची…

सावंतवाडी , ता २२:रस्त्याचे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या दोन लहान मुलांनी पाणी समजून डिझेल प्याल्याने दोन्ही बालकांची प्रक्रुती गंभीर बनली. त्याचेवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन त्यांना अधीक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे पाठविण्यात आले.

याबाबत सव्हिस्तर वृत्त असे की, कुडाळ-पिंगुळी येथे रस्त्याच्या कामासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांनी रात्रो दिवा पेटविण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीमध्ये डिझेल आणून ठेवले होते.
स्नेहल शिवानंद चव्हाण (वय साडेतीन वर्षे), विराट शिवानंद चव्हाण (वय दीड वर्षे) या दोन छोट्या मुलांनी बाटलीमध्ये ठेवण्यात आलेले डिझेल पाणी समजून प्याल्याने त्यांची प्रक्रुती गंभीर झाली. त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू गंभीर असल्याने त्यांना अधीक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविण्यात आले.

13

4