बांदा-पानवळ येथील संरक्षक भिंतीचे काम ग्रामस्थांनी रोखले…

2

निकृष्ठ कामाचा आरोप;उदया करणार बांधकामचे अधिकारी पाहणी…

बांदा.ता,२२:
बांदा-पानवळ येथे सुरू असलेले संरक्षक भिंतीचे काम हे निकृष्ट करण्यात येत असल्याने माजी सरपंच बाळा आकेरकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आज रोखले. ठेकेदाराने तात्काळ चांगल्या दर्जाचे साहित्य आणून काम सुरू केले. उद्या रविवारी सकाळी बांधकाम खात्याचे अधिकारी येऊन कामाची पाहणी करणार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पानवळ येथे संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य याठिकाणी आणून काम सुरू होते. याची माहिती आकेरकर यांना मिळताच त्यांनी याठिकाणी धाव घेत काम बंद पाडले.
यावेळी जीवन हरमलकर, बाळा मयेकर, सतीश डेगवेकर, गुरू धारगळकर आदी उपस्थित होते. यावेळी ठेकेदाराला जाब विचारत काम बंद पाडण्यात आले. यावेळी आकेरकर यांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. उद्या रविवारी सकाळी बांद्यात येऊन चर्चा करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी दिले. ठेकेदाराने तात्काळ निकृष्ट साहित्य गायब करून चांगल्या दर्जाचे साहित्य आणले.

4

4