दीपक केसरकर; “माझा वेंगुर्ले” तर्फे आयोजित पतंग महोत्सवाला प्रारंभ…
वेंगुर्ला.ता.२२: पतंग महोत्सवाबरोबरच येथे कायमस्वरुपी वॉटरस्पोर्ट चालू झाले तर पर्यटनदृष्ट्या हा भाग विकसित होईल. या भागात फिशिग व्हीलेजचा प्रकल्प पर्यटनदृष्ट्या विकसित झाल्यास भारतातील तो पहिला प्रकल्प ठरेल. तसेच उभादांडा गाव हा मंगेश पाडगांवकरांच्या स्मारकासाठी ‘कवितांचा गाव‘ म्हणून विकसित होत आहे. त्यामुळे उभादांडा गावाचे नाव जागतिकस्तरावर होईल. उभादांडा ग्रामपंचायतीने त्यासाठी सभा घेऊन प्रयत्न करावेत असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी पतंग महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी केले.
‘माझा वेंगुर्ला‘ तर्फे उभादांडा येथील बागायत बीचवर २२ व २३ फेब्रुवारी असे दोन दिवस भव्य दिव्य असा पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पतंग उडवून झाले. याप्रसंगी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उभादांडा सरपंच देवेंद्र डिचोलकर, पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, आंबा बागायतदार विरेंद्र कामत-आडारकर, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक प्रशांत आपटे, ग्रामपंचायत सदस्या अपेक्षा बागायतकर, श्रद्धा कुडाळकर, सावली आडारकर, ‘माझा वेंगुर्ला‘चे निलेश चेंदवणकर, राजन गावडे, वसंत तांडेल, अवधूत नाईक, कपिल पोकळे, सचिन वालावलकर, गणेश अंधारी, खेमराज कुबल, पंकज शिरसाट, श्रीनिवास सौदागर, शेखर मयेकर, विश्वास पवार, जयराम वायंगणकर, सुनिल डुबळे, अमर दाभोलकर, अशोक दाभोलकर-मेस्त्री, अमृत काणेकर, राजू पांगम आणि गुजरात-वापी येथील पतंग उडविणारी ‘फ्लाय ३६०‘ टीम उपस्थित होती.
गुजरात-वापी येथील ‘फ्लाय ३६०‘ टीमने खास पतंग आकर्षणाअंतर्गत श्री गणेश, सांताक्लॉज, तिरंगा, डायनॉसॉर, वटवाघुळ, टेडीबिअर, विमान या मोठ्या पतंगाबरोबरच छोट्या आकाराचे विविध स्वरुपाच्या पतंगांची बीचवर पतंगबाजी करण्यात आली. यावेळी पर्यटकांसह स्थानिक नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.