साटेली येथील अभंग गायन स्पर्धेचा प्रदीप कवठणकर मानकरी…

2

सावंतवाडी ता.२३:साटेली खालचीवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धेचा मानकरी कवठणी येथील प्रदीप कवठणकर ठरल, तर गाव मर्यादित स्पर्धेत सावली तावडे हीने प्रथम क्रमांक पटकाविला.महाशिवरात्रीचे औचित्य साधून ग्रामस्थांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ओंकार कलामंचाचे अध्यक्ष तथा पत्रकार अमोल टेंबकर,शुभम धुरी,बाबू कळंगुटकर,संतोष कांबळे,सत्यनारायण कळगुटकर,शेखर पणशीकर,सचिन मोरजकर,विलास साटेलकर सुरेश केरकर,संदेश गोवेकर रुपेश पंडित,जगन्नाथ नाईक,आदी उपस्थित होते.
यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे,द्वितीय सर्वेश राऊळ-कोलगाव,तृतीय गीता गवंडी-आसोली,उत्तेजनार्थ सागर पार्सेकर-न्हावेली तर गाव मर्यादित स्पर्धेत
द्वितीय आकांक्षा कांबळी,तृतीय तनश्री झारापकर, उत्तेजनार्थ सिद्धी पांढरे यांना मिळाला.या स्पर्धेसाठी तबलासाथ अक्षय कांबळी आणि रुपेश पंडित यांनी दिली.तर हार्मोनियम साथ अपूर्वा बुगडे यांनी केली.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शेखर पणशीकर (आरवली)आणि सुरेश केरकर (मान्द्रे गोवा) यांनी काम पाहिले.दरम्यान स्पर्धा यशस्वी करण्यासाठी
प्रणय पांढरे, प्रमोद साटेलकर, प्रणय साटेलकर, संतोष कुबल, संजय नाईक सचिन तावडे, गौरेश कोरगावकर, अनंत कळंगुटकर, बाळा कुबल, आदित्य नाईक, अजित कांबळी, सौ.समिधा तावडे आदींनी सहकार्य केले.

3

4