Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावेंगुर्ले-उभादांडा येथे रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

वेंगुर्ले-उभादांडा येथे रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

रोझारिओ व कार्मीस आल्मेडा मित्र मंडळाच्या उपक्रमाचे सभापतींकडून कौतुक…

वेंगुर्ले.ता.२३: 
उभादांडा रोझारिओ मित्रमंडळ व कार्मीस आल्मेडा यांच्या सहकार्याने आज रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी एकूण ३२ जणांनी रक्तदान केले. दरम्यान रोझारिओ मित्र मंडळ ने सलग पंधरा वर्षे हा सामाजिक उपक्रम राबविल्या बद्दल पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, शिवसेना महिला तालुका संघटक सुकन्या नरसूले व मान्यवरानी विशेष कौतुक केले.
उभादांडा शाळा न. २ येथे झालेल्या या कार्यक्रमला शिवसेना तालुका प्रमुख श्री. बाळू परब, उपजिल्हा प्रमुख, सुनील डुबळे, माजी नगराध्यक्ष श्री. संदेशजी निकम, श्री. सचिन वालावलकर, न्यूइंग्लिश स्कूल चे माजी मुख्याद्यापक श्री. कांबळी सर, माजी सरपंच श्री. इलियास फर्नांडिस, मोचेमाड उपसरपंच श्री. श्रीकांत घाटे, ग्रामपंचायत सदस्य श्रीम. टीना आल्मेडा, श्री. गणेश चेणवनकर, श्रीम. संजना गावडे, कुमारी आरती गावडे, युवा सेनाचे श्री. नितेश कुडतरकर, श्रीम. संजना कांबळी, श्रीम. विनिता तांडेल, श्री. संदेश मोघे, आनी रोसारिओ मित्र मंडळ यांनी हा कार्यक्रम होण्यासाठी मेहनत घेतली. उपस्थित मान्यवरांचे कार्मीस आल्मेडा यांनी आभार व स्वागत केले. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी डॉ. निलेश अटक, श्री. अनिल खाडे, पांडुरंग कुंभार, अस्लम शेख, श्रीम. मानसी बागेवाडी, यांनी या कॅम्प मध्ये सहभाग घेत सेवा दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments