सावंतवाडीतील चित्रकला स्पर्धेत दुर्वा वालावलकर प्रथम….

2

अनिल भिसे मित्रमंडळाचे आयोजन; द्वितीय ऋषभ गावडे तर तृतीय वैष्णवी नायर…

सावंतवाडी.ता,२३: क्रीडातपस्वी कै शिवाजीराव भिसे यांच्या स्मृती दिनानिमित्त पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत
प्रथम क्रमांक दुर्वा किशोर वालावलकर,द्वितीय क्रमांक वृषभ विनय गावडे, तर तृतीय क्रमांक वैष्णवी मनोज नायर हिने पटकाविला.या स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून निल बांदेकर,स्वयंम आपाजी पाटील,विधी वेटे यांना गौरविण्यात आले.दरम्यान या स्पर्धेत एकूण ५६ मुलांनी सहभाग घेतला होता.
सावंतवाडी येथे अनिल भिसे मित्रमंडळाने जनरल जगन्नाथराव भोसले बालोद्यान मध्ये नगराध्यक्ष संजू परब यांच्या सहकार्याने आयोजित केली होती .
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकार अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.यावेळी हस्ताक्षर सुधारक विकास गोवेकर सर,आयोजक अनिल भिसे,सौ.रिया भिसे,कु.तानीया भिसे,अरूण भिसे,बाळा हरमलकर,रत्नाकर माळी,बेंजामिन मारणेकर, डॉ साईनाथ सीतावार,पत्रकार अभिमन्यू लोंढे, राजेश मोंडकर, हेमंत मराठे,बाळा सावंत,अॅन्थोनी फर्नांडिस,श्री.सुराणा, चित्रकला शिक्षक श्री.मालवणकर,श्री.गोठोस्कर,ललीत हरमलकर,मारीया मारणेकर, किशोर वालावलकर आदी उपस्थित होते.योग शिक्षक,अक्षर सुलेखनकार विकास गोवेकर म्हणाले,कै.शिवाजीराव भिसे यांच्या स्मृती दिनी अनिल भिसे मित्रमंडळाने आयोजित केलेला पहिली व दुसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दिशा देणारा उपक्रम आहे.मुलांनी मोबाईल मध्ये गुंतून राहण्यापेक्षा अशा उपक्रमांना प्राधान्य दिले पाहिजे तसेच हस्ताक्षर सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.पत्रकार अभिमन्यू लोंढे म्हणाले,कै.भिसेसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या स्मृती दिनी अनिल भिसे मित्रमंडळाने आयोजित केलेला उपक्रम लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळवून देईल.
डॉ साईनाथ सितावर म्हणाले, मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून चित्रकला स्पर्धा महत्त्वाची आहे.यामुळे मुलांचे लक्ष केंद्रित होईल.पत्रकार राजेश मोंडकर यांनी कै.शिवाजीराव भिसे यांचा विद्यार्थी म्हणून त्यांना जवळून पाहिले, त्यांनी विद्यार्थी घडवल्यामुळेच आजही स्मृती विद्यार्थ्यांना वंदनीय आहेत.आयोजक अनिल भिसे म्हणाले, लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे.
यापुढेही कै.शिवाजीराव भिसे यांच्या स्मृती दिनानिमित्त उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.यावेळी चित्रकला परिक्षक विकास गोवेकर व मालवणकर सर यांनी परिक्षण केले. आयोजक अनिल भिसे, बाळा हरमलकर, रत्नाकर माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

4

4