वेंगुर्ला येथील दोन दिवसीय पतंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

2

माझा वेंगुर्ला तर्फे आयोजन; पतंगबाजीसह समुद्र सफर व वाळूतील खेळ ठरले आकर्षण…

  1. वेंगुर्ले,ता.१४:माझा वेंगुर्ला तर्फे बागायत बीच वर दोन दिवस चाललेल्या भव्य दिव्य अशा पतंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सलग ४ थ्या वर्षी हा सर्वांना आकर्षित करणारा महोत्सव सुट्टीचे दिवस असल्याने बहारदार ठरला. पतंग महोत्सवात टीम मेंग्लोर व टीम डहाणू, गुजराथ यांच्या सुबक पतंगांसह वाळूतील खेळ, समुद्र सफरी बरोबर सर्वानी खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला.बगायत बीचवर शनिवार व रविवार असे दोन दिवस हा महोत्सव रंगला. तालुक्यासह जिल्ह्यातील शेकडो नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन आनंद लुटला. महोत्सवात विविध रंगाचे, विविध आकाराचे, छोटे मोठे पतंग उडताना पाहण्याचा वेगळा आनंद सर्वांना मिळाला. त्याच प्रमाणे यावेळी किनाऱ्यारील वळूतील मजेशीर खेळ यामध्ये रस्सीखेच, गोणितील उड्या, आगीचे खेळ, उंट सफरी, सांकृतिक कार्यक्रम, वॉटर स्पोर्टस्, समुद्र स्फरिचाही आनंद अनुभवता आला.याच्या जोडीला विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल असल्याने चमचमीत पदार्थही सर्वांना चाखता आले. रात्री ऑर्केस्ट्रा असल्याने त्यालाही उपस्थितांचा प्रतिसाद लाभला.

2

4