अभिनेते माधव अभ्यंकर व समिधा नाईक याचा आकेरीवासीयांकडून सत्कार..

2

वेंगुर्ले.ता.२३: रात्रीस खेळ चाले मालिकेच्या सेट वर ‘सेल्फी घ्या पण त्याआधी जमेल ती रक्कम पेटीत टाका’ हा उपक्रम सेटवर अभिनेते माधव अभ्यंकर यांनी सुरू केला. सर्वच कलकार मंडळींनी याला उचलून धरलं. एक वर्षात दोन पेट्यात तब्बल एक लाख दहा हजार रुपये जमले ही रक्कम सैनिक स्कूल आंबोली शाळेला देण्यात आली. त्याच्या या कार्याबद्दल जेथे शुटींग चालू आहे तेथील आकेरी ग्रामस्थ यांच्याकडून अभिनेते माधव अभ्यंकर उर्फ अण्णा नाईक व आकेरी गावच्या सुन नुतन जि.प. अध्यक्षा सौ समिधा नाईक याचा सत्कार करण्यात आला.

रात्रीस खेळ चाले ही सीरियल अल्पावधीतच रसिकांच्या मनामध्ये राज्य केले आहे या सीरियलचे शुटींग आकेरी गावात अनेक वर्ष चालू आहे.अभिनेते माधव अभ्यंकर यांनी केलेले कार्य याची आकेरी ग्रामस्थ यानी दखल घेऊन त्याचा आकेरी रामेश्वर मंदिरात शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तर आकेरी गावच्या सुन नुतन जि प अध्यक्षा सौ समिधा नाईक याचा सत्कार साडी देऊन करण्यात आला. यावेळी माजी जि प सदस्य समीर नाईक, ग्रा प माजी सरपंच संदीप राणे, सदेश राणे,सौ रेवती राणे, सखाराम गावडे, बाळकृष्ण राऊळ, सुरेश चव्हाण, भरत राऊळ,मनोज परब,कांता नाईक,राजा गावडे सह आदी मान्यवर उपस्थित होते.

3

4