राजन तेलींचा इशारा;सत्ता मिळवून देणा-या शिवसेनेने कोकणाला फसविल्याचा आरोप
सावंतवाडी.ता,२४: शासनाकडुन सुरू असलेल्या अन्यायाच्या विरोधात जाग येण्यासाठी उदया ता.२५ ला जिल्ह्यातील आठ ही तालुक्यातील तहसीलदार कार्यालयासमोर भाजपा धरणे आंदोलन करणार आहे.असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.कोकणाच्या जीवावर शिवसेना सत्तेत आली खरी पण फडणवीस सरकारने दिलेल्या सर्व कामांना त्यांनी स्थगिति दिली आहे.यात जिल्हयातील महत्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे.हे दुदैव आहे.असे ही त्यांनी सांगितले.आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब तालुकाध्यक्ष संदीप गावडे,महेश धुरी,मनोज नाईक,सुधीर आडीवरेकर,आनंद नेवगी, विनोद सावंत,प्रमोद कामत,महेश सुदन बांदीवडेकर,राजू राऊळ,राजन राऊळ,अशोक सावंत,दादू कविटकर आदी उपस्थित होते.