सावंतवाडी ता.२४: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर असलेल्या मडुरा-रोणापाल-निगुडे रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम अध्याप सुरू न झालेल्या आज ग्रामस्थांच्या वतीने येथील तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात आले.याबाबत ८ फेब्रुवारीला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले होते.दरम्यान आठ दिवसात काम सुरू न झाल्यास उपोषण छेडू,असा इशारा देण्यात आला होता.त्यानुसार ग्रामस्थांकडून हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
यावेळी (सरपंच निगुडे) समीर गावडे,(उपसरपंच निगुडे)गुरुदास गवंडे (सरपंच रोणापाल) सुरेश गावडे,(माजी सभापती )पंकज पेडणेकर(सरपंच कुणकेरी) विश्राम सावंत,(सरपंच देवसू-दाणोली),संजना सावंत (सरपंच नेमळे) विनोद राऊळ(सरपंच वेर्ले) सुरेश राऊळ (सरपंच आरोंदा) उमा बुडे (माजी सभापती) रवींद्र मडगावकर, (उपसरपंच रोणापाल) भिकाजी केणि,(सरपंच पडलोस)सुभाष करमळकर,(उपसरपंच पडलोस)महादेव गावडे,कृष्णा केणि,उदय देऊलकर,विष्णु सावंत,संजय गावडे,प्रदीप नाईक, दत्ताराम परब, प्रकाश वालावलकर,वसंत जाधव आदि उपस्थित होते.