राजन तेलींकडून जाहीर; पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार
सावंतवाडी.ता,२४: भाजपच्या जिल्हा कार्यकारणी आज विस्तार करण्यात आला. यात निमंत्रक म्हणून माजी खासदार निलेश राणे,आमदार नितेश राणे यांना देण्यात आले. तर प्रवक्ते पदाची जबाबदारी सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब व बाबा मोंडकर यांच्याकडे देण्यात आली.भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी ही कार्यकारणी आज जाहीर केली आहे.भाजपा जिल्हाध्यक्षपदी तेली यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्ह्याची पहिलीच कार्यकारणी त्यांनी आज येथे जाहीर केली.
येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी बोलताना श्री तेली म्हणाले जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा समावेश करून योग्य ताळमेळ साधण्याचा प्रयत्न हा कार्य करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात लिही कार्य करणे आहे.लवकरच अजून दोन टप्प्यात कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असून पक्षसंघटना वाढवण्याबरोबरच पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे.येणाऱ्या काळात भाजपाचे पदाधिकारी आक्रमक भूमिका मांडून येथील भ्रष्ट अधिकारी व कामचुकार अधिकारी यांना जागा दाखवण्याचे काम पदाधिकारी करणार आहेत.सर्वसामान्यांना न्याय देण्याबरोबरच त्यांची कामे करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे तेली यांनी सांगितले. जाहीर केलेल्या कार्यकारणी मध्ये जिल्हाध्यक्ष राजन तेली कायम निमंत्रित म्हणून निलेश राणे आमदार नितेश राणे प्रमोद जठार ऍड.अजित गोगटे,अतुल कासेकर, दत्ता सामंत, विजयकुमार मराठे,श्यामकांत काणेकर,गुरुनाथ राऊळ, विलास हडकर,संदीप कुडतरकर, जिल्हा सरचिटणीस संघटन पदी जयदेव कदम,सरचिटणीसपदी मधुसूदन बांदिवडेकर,प्रसंना देसाई,अशोक सावंत,उपाध्यक्षपदी रामचंद्र खडपे, प्रमोद रावराणे संदेश सावंत,मनोज नाईक,प्रमोद कामत,एकनाथ नाडकर्णी, रणजित देसाई,प्रभाकर सावंत, जिल्हा प्रवक्ते पदी संजू परब बाबा मोंडकर, कोषाध्यक्षपदी चारुदत्त देसाई महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रज्ञा ढवण, राष्ट्रीय परिषद सदस्य पुखराज राजपुरोहित मंदार कल्याणकर सुरेश सावंत चिटणीस पदी महेश सारंग प्रकाश राणे नीलेश सामंत अनिल सावंत रवींद्र शेटये, विजय केनवडेकर तर कायदा सेल पदी ऍड.राजेश परूळेकर व सहकार सेल पदी कमलाकांत कुबल यांची निवड करण्यात आली आहे.