मडुरा निगुडे रस्त्याचे काम दोन दिवसात सुरू करणार…

2

अधिका-यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी पुकारलेले उपोषण घेतले मागे…

सावंतवाडी ता.२४: मडुरा-रोणापाल-निगुडे रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे काम येत्या दोन दिवसात सुरु करू,असे आश्वासन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आज येथील ग्रामस्थांकडून छेडण्यात आलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती.मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही.या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे,अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने वेळोवेळी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडे निवेदनातून करण्यात आली होती.दरम्यान आज या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.यावेळी माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी उपस्थिती दर्शविली.

1

4