Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedशिरोडा येथे जनरल स्टोअर्स दुकानाला आग...

शिरोडा येथे जनरल स्टोअर्स दुकानाला आग…

दुपारची घटना,; ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान…

वेंगुर्ले : ता.२४
शिरोडा ग्रामपंचायत इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या उल्हास परब यांच्या जनरल स्टोअर्स दुकानाला आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आग लागून सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.उल्हास परब हे दुपारी आपले दुकान बंद करून घरी गेले होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास परब यांच्या दुकानामधून धूर येत असल्याचे ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी पाहिले आणि तत्काळ परब यांना बोलाऊन दुकान खोलले असता आत फ्रिज सह अनेक वस्तू जळून खाक झाल्या होत्या. त्यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी लगेच आग विझवली. तो पर्यंत दुकानात मोठे नुकसान झाले होते.
*जि. प.सदस्य प्रितेश राऊळ यांच्याकडून तत्कळ आर्थिक मदत*
शिरोडा ग्रामपंचायत बिल्डिंग मध्ये उल्हास परब यांच्या जनरल स्टोअर्स दुकानाला अचानक आग लागून मोठया प्रमाणात नुकसान झाले. त्याची ताबडतोब दखल घेऊन भाजपचे रेडी जिल्हा परिषदचे सदस्य प्रितेश राऊळ यांनी श्री. परब यांना तात्काळ आर्थिक मदत केली. यावेळी शिरोडा गावचे भाजपचे सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच रवी पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल गावडे, सौ.समृद्धी धानजी, दिलीप गावडे, सौ.तृप्ती परब, सौ.विशाखा परब, सौ.प्राची नाईक, ग्रामसेवक सुनिल चव्हाण आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments