तब्बल २० वर्षे एस. टी. महामंडळामध्ये प्रामाणिक सेवा बजावल्याबद्दल बजरंग चव्हाण यांचा विजयदुर्ग आगारामार्फत सत्कार…

2

वैभववाडी.ता,२५:  तब्बल २० वर्षे एस. टी. महामंडळामध्ये प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावल्याबद्दल बजरंग पंडीत चव्हाण यांचा विजयदुर्ग आगारामार्फत सत्कार करण्यात आला. वैभववाडी तालुक्यातील सुपुत्र श्री. बजरंग चव्हाण हे विजयदुर्ग एसटी आगारात गेली वीस वर्ष सेवा बजावत आहेत. आपण जनतेचे देणे लागतो ही भावना मनात कायम ठेवून त्यांनी एसटी प्रशासनात जनता व प्रवाशांचा सेवक म्हणून कायम कामगिरी बजावली आहे. महिला व वयोवृद्ध व्यक्तीना प्रवासात त्यांनी नेहमी सन्मानपूर्वक वागणूक दिली आहे. निश्चितच अशा वयोवृध्दांचे आशिर्वाद समाजात चांगले काम करणाऱ्या वाहक चव्हाण यांच्या सारख्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी राहतील. बजरंग चव्हाण यांचा विजयदुर्ग आगातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेला सत्कार त्यांच्या कामाची पोच आहे. व अधिक बळ वाढविणार आहे. सत्कार प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष बाबू नाईक, सचिव राकेश तेली क पदाधिकारी उपस्थित होते. श्री बजरंग चव्हाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

2

4