कर्ज भरणाऱ्यांना न भरणाऱ्यांना एकचं न्याय का..?

2

नितेश राणेंचा सवाल; ट्विटरच्या माध्यमातून राज्य शासनाच्या धोरणावर टीका…

कणकवली ता.२५: कोकणातील शेतकरी आपली कर्ज शंभर टक्के परतफेड करतात,मग कर्ज भरणाऱ्यांना आणि न भरणा-यांना एकच न्याय का ?,असा सवाल भाजपाचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीत कोकणातील एकाही शेतकऱ्यांला कर्जमाफी देण्यात आली नाही.कोकणातील शेतकरी आपले कर्ज शंभर टक्के परतफेड करतात,त्यामुळे खाते एनपीए मध्ये जात नाही.या पार्श्वभूमीवर श्री.राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा सवाल केला आहे.
यापुढे कोकणचे शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये तसे ते माफ होणार आहे असा टोला सुद्धा या ग्रुपच्या माध्यमातून लगावला आहे त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून राज्य शासनावर टीका केली आहे

3

4