सिंधुदुर्गातील परिस्थिती; बँक प्रशासनाच्या विरोधात जयराम राऊळ यांची नाराजी…
ओरोस ता.२५:
जिल्ह्यातील बँकांच्या काही एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या जुन्या मळक्या, खराब झालेल्या नोटा ठेवल्या जातात. वेंगुर्ले तालुक्यातील काही एटीएममध्ये प्लॅस्टिक पट्टी लावलेल्या व डाग असलेल्या नोटा ग्राहकांना एटीएममधून येत असतात. त्या एटीएमच्या बँकेत गेल्यावर या नोटा आमच्या नाहीत, असे सांगून हात वर केले जातात. परिणामी खातेदारांना या नोटा बदलण्यासाठी स्टेट बँकेत जावून या नोटा बदलून घ्याव्या लागतात. याचा मनस्ताप ग्राहकांना होतो. त्यामुळे बँकांनी एटीएममध्ये पैसे भरताना चांगल्या नोटा भराव्यात. नोटा सुस्थितित असल्याची खात्री करूनच नोटा भरल्यास ग्राहकांना होणारा मनस्ताप वाचेल, असे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षक परिषद सदस्य जयराम राऊळ यांनी केले आहे.