Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामळेवाड येथील दुचाकी अपघातात वृद्धासह तिघे जखमी...

मळेवाड येथील दुचाकी अपघातात वृद्धासह तिघे जखमी…

मळेवाड/मदन मुरकर.ता,२६:  येथे झालेल्या दुचाकी अपघातात एका वृद्धासह अन्य दोघे जखमी झाले.ही घटना आज साडेदहा वाजता मळेवाड पुलानजीक घडली.दादा गावडे रा. शिरसाटवाडी असे गंभीर जखमीचे नाव आहे.त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले.तर अन्य दोन जखमींना उपचार करून घरी सोडण्यात आले.दुचाकी समोरासमोर धडक दिल्यामुळे हा अपघात घडला.अशी माहिती तेथील स्थानिकांकडून देण्यात आली.या अपघातात दोन्ही दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments