सावंतवाडी.ता,२६: काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अखेर आज चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची निवड करण्यात आली. याबाबतचे पत्र आज त्यांना पक्ष नेतृत्वाकडून पाठविण्यात आले आहे.तत्कालीन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.मात्र या पदावर गेले काही दिवस काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरू होते. परंतु आज त्या ठिकाणी गावडे यांना अधिकृत जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
याठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली. श्री गावडे यांना जबाबदारी देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात पक्ष वाढण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे.
श्री गावडे हे गेली अनेक वर्षे राजकारण व समाजकारण करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन काँग्रेसचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. यापूर्वी त्यांनी सावंतवाडी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद बांधकाम सभापती , काँग्रेसचे प्रांतिक सदस्य ,तालुकाध्यक्ष अशा विविध पदांवर सक्षम पणे जबाबदारी पेलली होती. पाच वर्षापुर्वी विधानसभा निवडणुकीत संधी सुद्धा काँग्रेसकडून गावडे यांना देण्यात आले.त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांनाही संधी देण्यात आली आहे