शिरोडा ग्रंथालयात उद्या अक्षरोत्सव प्रदर्शनाचे आयोजन…

2

वेंगुर्ले.ता.२६:मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयामध्ये गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत “अक्षरोत्सव” हस्ताक्षर संग्राहक आणि पत्रकार निकेत पावसकर यांच्या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांच्या संग्रहाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दिवसभर हे प्रदर्शन सुरू असणार आहे. यावेळी देश आणि परदेशातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह श्री सचिन गावडे आणि ग्रंथपाल सौ. अर्चना लोखंडे यांनी केले आहे.

3

4