Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआंगणेवाडी जत्रौत्सवाचा महिला बचत गटांना फायदा...

आंगणेवाडी जत्रौत्सवाचा महिला बचत गटांना फायदा…

सतीश सावंत यांची माहीती;चार दीवसात ४५ लाखाची झाली उलाढाल…

ओरोस,ता.२६: आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या जत्रोत्सवात सिंधुदुर्ग जिल्हा बँक, राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष व माविम यांच्या सहकार्यातून जिल्ह्यातील बचतगटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री स्टॉल उभारण्यात आले होते. 16 ते 18 फेब्रुवारी या चार दिवसात बचतगटांनी लावलेल्या स्टॉलला भाविक ग्राहकांचा भरभरुन प्रतिसाद लाभला असून सुमारे 45 लाख रुपयांची विक्री झाली असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या सहकार्यातून जिल्ह्यातील महिला बचतगटानी उत्पादित केलेल्या मालाचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी 2011 पासून आंगणेवाडी जत्रेत विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली जाते. तसेच त्यांच्या अल्पोपआहार व भोजनची व्यवस्था केली जाते. त्याप्रमाणे 17 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या आंगणेवाडी जत्रेमध्ये याचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील बचतगट मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. तसेच यावेळी मालवणी खाद्य पदार्थ, अन्य उत्पादित माल विक्रीसाठी ठेवला होता.
या आयोजना मागचा मुख्य उद्देश हा गटातील महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करणे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. यामध्ये दरवर्षी नवनवीन गटांना प्राधान्य दिले जाते. पहिल्याच 2011 या वर्षी केवळ 40 बचतगट सहभागी झाले होते. 2020 च्या आयोजनात 100 गटांनी सहभाग घेतला होता. सुरुवातीला 4 ते 5 लाखांची विक्री होत होती. यावर्षी 45 लाखांची विक्री झाली आहे. मुंबई, गोवा, कोल्हापुर येथून आलेल्या भाविकांनी खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे, असे सावंत यांनी प्रसिद्धि पत्रकात नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments