बांदा येथे उद्यानातील खेळणी बसविण्याचे काम रोखले…

2

दर्जा निकृष्ठ असल्याचा आरोप; पंचायत सदस्य काणेकर यांनी विचारला जाब…

बांदा ता.२७: ग्रामपंचायतीच्या आळवाडी येथील उद्यानात बोगस व निकृष्ट दर्जाची खेळणी बसविण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच शिवसेना बांदा शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी काम रोखले.
येथील उद्यानात ग्रामपंचायतीने खेळणी बसविण्याचा ठेका कोल्हापूर येथील ठेकेदाराला दिला होता. त्यानुसार उद्यानात खेळणी बसविण्याचे काम सुरू होते. निकृष्ठ दर्जाची खेळणी बसविण्यात येत असल्याची माहिती मिळताच काणेकर यांनी याठिकाणी येत काम बंद पाडले. यावेळी ठेकेदाराला जाब विचारण्यात आला. यावेळी उपसरपंच हर्षद कामत व ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब उपस्थित असल्याची माहिती काणेकर यांनी दिली.

2

4