डोक्यात स्टंम्प मारल्याप्रकरणी माजगाव येथील एकाला अटक…

2

सावंतवाडी ता.२७: क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून डोक्यावर स्टप मारून गंभीररित्या जखमी केल्याप्रकरणी भगवान महादेव घाडी (२४) रा.माजगाव,याला आज सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले.ही घटना १३ फेब्रुवारी रोजी माजगाव येथे घडली होती.दरम्यान जखमी ओंकार सुभाष राणे (रा.माजगाव) याच्यावर गोवा-बांबुळी येथे उपचार सुरू होते.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान आज डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर ३२६ अन्वये गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

2

4