श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद…

2

मालवण, ता. २७ : कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय येथे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्म दिन व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित भव्य ग्रंथप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय परब, सचिव प्रविण पारकर, खजिनदार गजानन सुर्वे, पांडुरंग राणे, उपसरपंच आनंद आयकर, ग्रंथपाल साक्षी मेस्त्री, माजी ग्रंथपाल दिपाली पारकर, शिक्षिका श्रीमती फर्नांडीस, अश्विनी लाड, आशिष आचरेकर, विशाल राणे, महेश साळकर आदी उपस्थित होते. या प्रदर्शनाचा गावातील असंख्य वाचकांनी लाभ घेतला.

7

4