नागरिकांत भीतीचे वातावरण;योग्य तो बंदोबस्त करा, वनविभागाकडे मागणी…
सावंतवाडी,ता.२८: येथील नरेंद्र डोंगर परिसरात गव्यांच्या कळपाने पुन्हा एकदा आपली हजेरी लावली.त्या ठीकाणी तीन ते चार गवे फीरताना अनेकांना दिसले. ही घटना काल रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती पालिकेचे वैद्यकीय अधिकारी उमेश मसुरकर यांनी दिली.
त्यांच्या घराच्या परिसरात ते दिसले. सहा ते सात महिन्यापूर्वी बाजूला असलेल्या एका बिल्डिंगच्या शौचालयाच्या टाकीत गवा पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग व नागरिकांना मोठे कष्ट घ्यावे लागले होते.आता या ठीकाणी गवे फिरत आहेत.त्यामुळे त्यांच्यापासून कोणताही धोका होऊ नये म्हणून योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.