वैद्यकीय अधिका-यांचा अहवाल; सामाजिक कार्यकर्ते कल्याणकर यांची चौकशीची मागणी…
बांदा,ता.२८: रेडी मायनिंग परिसरात असलेल्या विहिरींचे पाणी आरोग्यासाठी दूषित असल्याचा अहवाल तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
या पाण्यामुळे कीडनी, मुतखड्याच्या आजारासह फुफुसाचे आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
तर भुजल तपासणी विभागाकडून परिसरातील पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचा दावा करण्यात आला असून आपल्यावरची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकारात राज्याचे आरोग्य मंत्र्यांनी लक्ष घालावे. तसेच जिल्हाधिकार्यांनी त्याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी आपण केली आहे. असे कल्याणकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.